¡Sorpréndeme!

ऑल महाराष्ट्र टेंन्ट डिलर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा| Sakal Media |

2021-04-28 195 Dailymotion

कोल्हापूर : सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालय व हॉलमधील एकूण क्षमतेपैकी निम्म्या आसन क्षमतेच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी मिळावी किंवा किमान 500 लोकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमास मान्यता असावी, यासह अन्य प्रमुख मागण्यासाठी ऑल महाराष्ट्र टेंन्ट डिलर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले. असोसिएशनचे चेअरमन सागर चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये पार पडलेल्या यामोर्चामध्ये महापौर निलोफर आजरेकरांसह अनेक मान्यवर, पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.

बातमीदार - सुयोग घाटगे

व्हिडिओ - मोहन मेस्त्री